तात्कालिक घटना व प्रत्यक्ष युद्ध[संपादन]
पाकिस्तानने वेष बदललेल्या सैनिकांना मुजाहिदीन (स्वातंत्र्यसैनिक) म्हणून काश्मिरात पाठवले. असे केले की घडलेली घटना काश्मिरी "जनतेचा उठाव" असे दाखवून काश्मीर भारतापासून तोडता येईल. ते तथाकथित मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोचलेसुद्धा. त्यांनी तिथे काही प्रमाणात हिंसाचारही केला. भारतीय सैनिकांवर हल्ले केले. उद्देश हाच की काश्मिरी जनताच कशी "बंड" करून उठली आहे व आता भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये कसे आराजक माजले आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मिरात कसे सगळे आलबेल आहे हे दाखवणे. म्हणजेच, भारताला अचानक उठाव करून काश्मीरमधून हुसकावून लावणे व काश्मीर अलगद घशात घालणे शक्य होईल. जर काश्मिरी लोकांनी पाकिस्तानात सामील होण्यास विरोध केलाच तर ताबडतोब त्यांना तथाकथित स्वातंत्र्य देऊन स्वतःचे अंकित राष्ट्र बनवणे हा उद्देश.
पहिले काही असे तथाकथित "स्वातंत्र्यसैनिक" भारतात पोचताच ह्याचा सुगावा लागला, व रागाचा पारा चढलेल्या भारताने ताबडतोब मग थेट राजस्थान आणि पाकिस्तानी पंजाब यांमधली आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत फारशा प्रतिकाराशिवाय लाहोर-सियालकोटाच्या अगदी जवळपर्यंत धडक मारली व अचानक घोडदौड थांबवली. का? तर भारतीय लष्कराला थेट निर्विरोध इतका आत प्रवेश मिळणे म्हणजे कदाचित एखादा मोठा trap असू शकत होता. निदान तशी शंका भारतास आली आणि अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचे ठरवण्यात आले. एवढा वेळ मिळाल्याने पाकिस्तानने लागलीच सैन्याची जमवाजमव करून लाहोरच्या पिछाडीपर्यंत सैन्य आणले. व आख्खे शहर काही दिवस का असेना पण ताब्यात ठेवायचा भारताचा प्रयत्न हुकला.
पण मुळात असे झालेच कसे? लाहोर आणि सियालकोट ही महत्वाची शहरे संरक्षणहीन कशी ठेवली गेली? कारण भारत मुळात आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडेल हेच मुळात लश्करशहा अयुबखान ह्याला वाटत नव्हते. त्याची अपेक्षा ही होती की मुळात काश्मीर हा भारत-पाक ह्यांच्या ताब्यात अर्धा-अर्धा असा आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरून (LineOfControl) म्हणजे काश्मीरमधून भारत हल्ला करेल. ह्या भागात लढाई करणे पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते कारण युद्धमान स्थितीत (दोन्ही बाजूंच्या ताब्यातील भौगोलिक रचना लक्षात घेता)भारताला आपल्या सैन्याला रसद पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे होते. तेच पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते. हे लक्षात घेऊन भारताने तिथे युद्ध करणे टाळले. इतकेच काय, तर भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या काही चौक्याही भारताने दुर्लक्षित केल्या.
खेमकरण सेक्टर मध्ये अमेरिकेकडून पाक ने मिळवलेले पॅटन रणगाडे भारतीय सैनिक अब्दुल हमीद सारख्यांच्या पराक्रमामुळे आपण थांबवू शकलो.. पाकसीमेवरील गुजरात राज्यातील कच्छच्या रणातील ५०० चौरस किलोमीटर च्या आसपासचा भाग पाकिस्तानने मिळवला. मॅकमोहन लाईन जशी चीनसोबतचा वादग्रस्त मुद्दा आहे तसाच काश्मीरवरून पाकसोबत वाद आहेत. कच्छच्या रणाबद्दलही पाकिस्तानशी वाद आहेत. तिथेही स्पष्ट आणि उभयपक्षी मान्य अशी आंतरराष्ट्रीय सीमारेषा नाही. शिवाय आता त्याच भागाच्या आसपास भरपूर नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याने एक नवेच वळण त्या वादाला लागू शकते.